E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
मस्क यांनी सोडली ट्रम्प यांची साथ
Samruddhi Dhayagude
30 May 2025
वॉशिंग्टन : अमेरिकन अब्जाधीश एलन मस्क यांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची साथ सोडली आहे. मस्क यांनी गुरुवारी सकाळी एक्सवर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली.
सरकारी खर्च कमी करण्यासाठी आणि नोकरशाही कमी करण्यासाठी ट्रम्प प्रशासनात तयार केलेल्या डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सीच्या प्रमुखपदाची जबाबदारी मस्क यांना देण्यात आली होती. मस्क यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘विशेष सरकारी कर्मचारी म्हणून माझा कार्यकाळ संपत आहे. सरकारी खर्च कमी करण्याची संधी दिल्याबद्दल मी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानू इच्छितो. डीओजीई मिशन कालांतराने अधिक मजबूत होईल. कारण ते सरकार चालवण्याचा एक मार्ग बनेल.’
दरम्यान, व्हाइट हाऊसच्या एका अधिकार्याने नाव न सांगण्याच्या अटीवर मस्क यांच्या राजीनाम्याला दुजोरा दिला आहे. २०२४ च्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत मस्क आणि ट्रम्प एकत्र आले. मस्क यांनी ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारावर २७७ मिलियन पेक्षा जास्त खर्च केले आणि ते मोहिमेचा भाग बनले. ट्रम्प यांनी मस्क यांना प्रशासनात विशेष सरकारी कर्मचारी म्हणून नियुक्त केले होते. त्यानंतर गेली १३० दिवस सरकारमध्ये काम करत राहिले. मस्क यांनी ट्रम्प यांची साथ सोडण्यापूर्वी ट्रम्प यांनी आणलेले बिग ब्यूटीफुलाला विरोध केला होता. त्यात मल्टी-ट्रिलियन डॉलरसाठी टॅक्स ब्रेक आणि संरक्षण खर्च वाढवण्याचे आश्वासन दिले होते. मस्क यांनी जाहीरपणे या बिलावर नाराजी व्यक्त केली होती.
टेस्ला मोटारींच्या विक्रीत घट
मस्क यांच्या टेस्ला मोटारींच्या विक्रीत सतत घट होत आहे. टेस्लाच्या शेअर्समध्येही सतत घसरण होत आहे. यामुळे गुंतवणूकदार बाहेर पडत आहे. त्यामुळे टेस्ला गुंतवणूकदारांनीही मस्क यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्याचा परिणाम कंपनीच्या विक्रीवर झाला आहे.
Related
Articles
पुणे वॉरियर्स संघाला विजेतेपद
16 Jun 2025
प्रदेशाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मुक्त करा
11 Jun 2025
जपानला भारताने मागे टाकण्यावर शिक्कामोर्तब
12 Jun 2025
भारताच्या नवीन जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची सुरुवात होणार : ब्रेंडन मॅक्युलम
13 Jun 2025
पिंपरी-चिंचवड शहराचा पाणीपुरवठा उद्या बंद
11 Jun 2025
नोकर्यांच्या बाजारपेठेत वाढती लगबग
18 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक